भाजपने कोणाला मंत्री केले म्हणून शिवसेनेची ताकद कमी होणार नाही

सामना ऑनलाईन । मालवण

एकही आमदार नसलेल्या पक्षाला मंत्रीपद देण्याची तयारी भाजपकडून सुरू आहे. मात्र ७५ आमदार आणि २१ खासदार आहेत अशा मित्रपक्षावर भाजपचे पदाधिकारी टीका करत सुटले आहेत. भाजपने कोणालाही मंत्री केले म्हणून शिवसेनेची ताकद कमी होणार नाही. उलट शिवसेनेच्याच पाठपुराव्यामुळे आणि शासनावरील दबावामुळेच सिंधुदुर्गातील विकासकामांसाठी यापुढेही मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध होत राहील असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लागावला.

मालवण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार नाईक बोलत होते. गुरुवारी दिवसभराच्या मालवण दौऱ्यावर नाईक आले असताना त्यांनी पालिकेला भेट दिली. बंदर जेटीवर पर्यटकांचे उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून मेरीटाइम बोर्डाकडून उभारण्यात येत असलेल्या शेडचा शुभारंभ नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी नगरसेवक पंकज सादये, सुनीता जाधव, आकांक्षा शिरपुटे, तृप्ती मयेकर, तालुकाप्रमुख बबन शिंदे, गोपी पालव, किल्ले वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत, शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, रवी तळाशिलकर, उदय गावडे, स्वप्नील आचरेकर, दीपा शिंदे, अंजना सामंत, रश्मी परूळेकर, नंदू गवंडी, तपस्वी मयेकर, यशवंत गावकर, गणेश कुडाळकर, तुळशीदास मयेकर, महेश शिरपुटे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.