सरकारला जागं करण्यासाठी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या हाती दिला आसूड

8

सामना ऑनलाईन, बीड

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बीडमध्ये येताच पहिले दुष्काळी परिस्थिती पाहण्यासाठी तळेगावला जाण्याचा निर्णय घेतला. तिथली भीषण परिस्थिती पाहून उद्धव ठाकरे जबरदस्त अस्वस्थ झाले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी सखाराम मस्के, सुनील घोलप,अप्पराव कदम, सर्जेराव घोलप या शेतकऱ्यांची संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना उद्धव म्हस्के या निपिकीमुळे उद्वस्त झालेल्या शेतकऱ्याने उद्धव ठाकरे यांच्या हाती एक आसूड आणून दिला.”सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी आता हा आसूड हातात घ्या साहेब तुम्हीच आमचे कैवारी आहात” असं या शेतकऱ्याने म्हटताच उद्धव ठाकरे ताडकन म्हणाले की  मी शेतकऱ्यांसोबत आहे आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, घाबरू नका, दुष्काळ किती ही भयावह असला तरी आपण त्याचा सामना करू

आपली प्रतिक्रिया द्या