चोरीला गेलेला रस्ता शोधा व काम न करताच ठेकेदाराला बील देणाऱ्याची चौकशी करा!

2

सामना प्रतिनिधी । वलांडी

केंद्रीय निधी अंतर्गत नांदेड – गुलबर्गा या राज्य मार्ग क्रमांक 252 वरील देवणी तालूक्यातील सय्यदपूर – कवठाळा – वलांडी बोंबळी रस्त्यासाठीचा 10 कोटीचा मंजूर निधी काम न करताच ठेकेदाराच्या पदरात टाकून उखळ पांढरे करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाची चौकशी करावी, केलेला रस्ता कसा गायब झाला याचा शोध घ्यावा आदी मागण्यांसाठी शुक्रवारी वलांडीत शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको करण्यात येणार आहे.

रस्ता चोरीला (रेकार्डनुसार) गेला असून या रस्त्याचा शोध घेण्याचे निवेदन शिवसेनेच्यावतीने बुधवारी देवणीचे तहसिलदार जिवककुमार कांबळे यांना देण्यात आले. शिवाय या प्रकरणी शुक्रवारी वलांडीच्या बसस्थानक चौकात रास्ता रोको करण्याचा गर्भित इशाराही निवेदनात दिला आहे. मात्र रस्ता चोरीला गेल्याच्या चर्चेला वलांडी परिसरात चांगलाच ऊत आला आहे.