शिवसेनेची मालवणमध्ये दुसरी उमेदवार यादी जाहिर

सामना ऑनलाईन । मालवण 

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने दुसरी यादी जाहीर गुरुवारी (ता. २) सायंकाळी जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे जाहिर केली. मालवण  कुडाळ तालुक्यातील १ जिल्हा परिषद आणि ७ पंचायत समिती उमेदवार यांचा समावेश आहे.

मालवण आचरा जिल्हा परिषद – समीर हडकर,  पंचायत समिती आडवली मालडी – संतोष वासुदेव घाडी, आचरा – निधी मुणगेकर, मसूरे – शमा संदीप हडकर,  पेंडूर – प्रदीप अनाजी सावंत, वायरी भूतनाथ – मधुरा चोपडेकर, कुडाळ –  पंचायत समिती आंब्रड – शेखर परब, झाराप – स्नेहा परब या नावांचा दुसऱ्या यादीत समावेश आहे.

३१ जानेवारी रोजी जिल्हाप्रमुख नाईक यांनी १५ जिल्हा परिषद व् २७ पंचायत समिति उमेदवार यांचा समावेश होता.
शुक्रवार ३ रोजी सकाळी १० वाजता मालवण तालुका शिवसेनेची आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितित शहरात बैठक होणार आहे. त्यानंतर मिरवणुकीने शिवसेना उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, अशी माहिती शिवसेनेच्या वतीने देण्यात आली.