विनायक राऊत टॉप टेन खासदारांच्या यादीत

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी

लोकसभा सभागृहामध्ये जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून मागण्या लाऊन धरणाऱ्या टॉप टेन खासदारांमध्ये शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी स्थान पटकावले आहे. सर्वाधिक प्रश्न मांडणाऱ्या खासदारांच्या टॉप टेन यादीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांची निवड झाली आहे. त्यांनी सभागृहात एकूण ४७० प्रश्न मांडले.

‘इंडिया स्पेंड अॅनालिसेस’ या संस्थेने लोकसभेच्या सभागृहात जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या खासदारांची एक यादी जाहीर केली आहे. खासदारांनी मांडलेल्या प्रश्नांच्या संख्येवरुन त्यांची निवड करण्यात येते. या यादीमध्ये खासदार सुप्रिया सुळे या प्रथम क्रमांकावर आहेत. त्यांनी सर्वाधिक ५६८ प्रश्न मांडले. गतवर्षीही या यादीतील पहिल्या दहाजणांत विनायक राऊत यांनी स्थान पटकावले होते.