शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात

59

कल्याण – कल्याणच्या ऐतिहासिक भगवा तलाव परिसरात पालिकेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक साकारले जात आहे. आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्मारक परिसराला भेट देऊन कामाची पाहणी केली. १० जानेवारीपूर्वी स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

स्मारकस्थळाची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अगदी कमी कालावधीत शिवसेनाप्रमुखांचे स्मारक पूर्ण करण्याचे शिवधनुष्य पालिका प्रशासनाने पेलले आहे. कामाचा दर्जा राखत शिवसेनाप्रमुखांच्या कार्याला साजेसे असे हे स्मारक असेल. कोल्हापुर येथे बाळासाहेबांचा २२ फूट उंचीचा पुतळा तयार झाला आहे. आता भगवा तलावाच्या काठावर युद्धपातळीवर स्मारकाचे काम सुरू आहे. या ठिकाणी आर्ट गॅलरी, म्युझियम, बाळासाहेबांचे चित्र चरित्र, त्यांची गाजलेली भाषणे असा सर्व जीवनपट जनतेसमोर मांडला जाईल. अनेक पिढ्यांना मार्गदर्शक असे हे स्मारक असेल, असे ते म्हणाले.
यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार सुभाष भोईर, महानगरप्रमुख विजय साळवी, सभागृह नेता राजेश मोरे, गटनेता रमेश जाधव, शहरप्रमुख विश्‍वनाथ भोईर, सचिन बासरे, रवी पाटील, दीपेश म्हात्रे, रमेश म्हात्रे, महिला आघाडी जिल्हा संघटक विजया पोटे आदी उपस्थित होते.
आपली प्रतिक्रिया द्या