शिवसेना तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक संपन्न

सामना प्रतिनिधी । तुमसर

शिवसेना भंडारा जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ याच्या मार्गदर्शनाखाली तुमसर – मोहाडी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व शिवसेनेच्या अंगीकृत संघटनेच्या आजी – माजी पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक यांची आढावा बैठक सिंधी धर्मशाळा, तुमसर येथे संपन्न झाली. यावेळी आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली.

बुथप्रमुख, शाखाप्रमुख यांच्या यादी व पक्ष बळकटीसाठी केलेल्या कामांचा अहवाल सादर करण्यासंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. युवासेनेचे सहसचिव निलेश पाटील, विक्रांत राठोड, उपजिल्हाप्रमुख सुधाकर कारेमोरे, तालुका प्रमुख नरेश उचिबघले, शहर प्रमुख नितीन सेलोकर, अमित एच. मेश्राम, गुड्डू डहरवाल, मनोज चौबे, जितेश ईखार, प्रकाश पारधी, जगदीश त्रिभुवनकर, कैलास जलवाने, किशोर यादव, दिनेश पांडे, संजू डहाके, शैलेश मिश्रा, अनिल दुर्गकर, योगराज टेंभरे, राजेश बुराडे, ईश्वर भोयर, विक्रांत तिवारी, अरविंद पटले, निलेश पाटील, निलेश वाडीभस्मे सह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.