शिवसेना गोव्यात लढवणार लोकसभेच्या दोन्ही जागा – राऊत

सामना वृत्तसेवा । पणजी

गोव्यात शिवसेनेला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षवाढीचे काम सुरू आहे. शिवसेना सुभाष वेलिंगकर यांना विश्वासात घेऊन गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा लढवण्याबरोबरच गोव्यात प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावेल, अशी माहिती शिवसेनेचे गोवा प्रभारी खासदार संजय राऊत यांनी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

परिमल पंडीत आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश दिल्यानंतर राऊत यांनी पत्रकारांशी संवादा साधला. त्यावेळी बोलताना शिवसेना गोव्यातील लोकांना भेडसावणारे विषय घेऊन विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

गोव्यात आरोग्य यंत्रणा सक्षम नाही. गोव्यातील लोकांना अनेकवेळा उपचारासाठी शेजारील राज्यात जावे लागते. ही समस्या ओळखून सामाजिक जाणीव जपणाऱ्या शिवसेनेने गोव्यात फिरते दवाखाने आणि रुग्णवाहिका देण्याची तयारी सुरू केली आहे, असे राऊत यांनी यावेळी सांगितले. नवरात्री दरम्यान आरोग्य शिबिरे घेणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे गोव्यात…

ऑक्टोबर महिन्यात उद्धव ठाकरे गोव्यात येऊन पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली.