नगर, जामखेड, सोलापूर, बाह्यवळण रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा!

70

सामना प्रतिनिधी । नगर

नगर-जामखेड रस्ता, नगर-सोलापूर रस्ता तसेच बाह्यवळण रस्त्याची सध्या मोठी दुरावस्था झाली आहे. या सर्वच रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले असून दररोज अपघात होत आहेत. वाहनचालकांना कसरत करीतच वाहन चालवावे लागत असून रस्त्यांच्या कामांचे टेंडर झाले असतानाही काम प्रत्यक्षात सुरु होत नाही. येत्या पंधरा दिवसांत सर्व रस्त्यांचे खड्डे बुजवावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जि.प.सदस्य संदेश कार्ले यांनी दिला आहे.

जामखेड, सोलापूर रस्त्याची दुरवस्था, बायपासवरील खड्डे यासंदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जी.एस.मोहिते यांची भेट घेवून निवेदन दिले. यावेळी पं.स.सभापती रामदास भोर, शिवसेना नगर तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, उप तालुकाप्रमुख प्रकाश कुलट, प्रविण कोकाटे, सागर कुलट, पं.स.सदस्य रवींद्र भापकर, व्हि.डी.काळे, गुलाब शिंदे, लक्ष्मण धसाळ, आबा कोकाटे, विलास शेडाळे आदींसह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या