ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांवर बूटफेक, आरोपीची झाली धुलाई

सामना ऑनलाईन । बारगढ, ओडिशा

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर बूट भिकवण्यात आला आहे. येथील सभेत बोलताना एका व्यक्तीने त्यांच्यावर बूट भिरकावला. यावेळी सुरक्षा रक्षकांनी सावधगिरी दाखवल्याने त्यांना हा बूट लागला नाही. बारगढमध्ये प्रचार सभेत पटनायकांनी भाषण केले. हे भाषण संपल्यानंतर उपस्थितांना हात हालवून अभिवादन करताना त्यांच्यावर त्या व्यक्तीने बूट भिरकावला. मात्र त्याचवेळी सुरक्षा रक्षकांनी पटनायकांना तातडीने बाजूला केले. त्यामुळे त्यांना कोणतीही इजा झाली नाही.

बूट फेकणाऱ्या व्यक्तीला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले. त्याला सुरक्षा रक्षक तसेच लोकांनी मारहाण केली. या मारहाणीध्ये तो जखमी झाला. त्याच्यावर बारपाली येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापूर्वी बालसोर येथील कार्यक्रमात एका महिलेने पटनायक यांच्या दिशेने अंडे फेकले होते. त्यावेळी ते अंडे पटनाकांपर्यंत पोहचलेच नव्हते. या अंडाफेक करणाऱ्या महिलेला समज देऊन पोलिसांनी सोडून दिले होते.