इन्स्टाग्रामवर श्रद्धा कपूर नंबर वन

14

सामना ऑनलाईन । मुंबई

गेले काही दिवस ‘स्त्री’ या चित्रपटामुळे चर्चेत राहिलेली आशिकी गर्ल श्रद्धा कपूर स्कोर ट्रेंडस् इंडियाच्या अनुसार इन्स्टाग्रामवर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी बनली आहे. श्रद्धाने आलिया भट्ट, प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोणसारख्या मातब्बर अभिनेत्रींना मागे टाकत इन्स्टाग्रामवर नंबर वन स्थान पटकावले आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंडस् इंडिया या मीडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. इन्स्टाग्रामवर श्रद्धा 100 गुणांसह सर्वश्रेष्ठ बनली आहे तर अलिया भट्ट 85 गुणांसह दुसऱया तर दीपिका पदुकोण 68 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे. प्रियंका चोप्राने 66 गुणांसह चौथे स्थान पटकावले आहे. सोनम कपूर-अहुजा 59 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या