थुकरटवाडीमध्ये अवतरली श्रीदेवी

सामना प्रतिनिधी, मुंबई

निळ्या रंगाची नऊवारी, हातात भरगच्च बांगड्या, नाकात नथ असा बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचा मराठमोळा अंदाज लवकरच प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

आगामी ‘मॉम’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी श्रीदेवी नुकतीच ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर आली होती. यावेळी तिचा खास मराठमोळा अंदाज सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय ठरला होता.