श्री गुरू हावगीस्वामी यात्रा महोत्सवास 16 जानेवारी पासून प्रारंभ


सामना प्रतिनिधी, उदगीर

श्री गुरु हावगीस्वामी महाराज यात्रा महोत्सव बुधवार 16 जानेवारी पासुन सप्तकोटी शिवपंचाक्षर महामंत्र जपयज्ञ, अखंड शिवनाम सप्ताह व परमरहस्य ग्रंथाच्या पारायणास प्रारंभ होत आहे. उदगीरचे आराध्य दैवत श्री गुरु हावगीस्वामी महाराज यात्रा महोत्सव समितीच्या वतीने श्री गुरू हावगी स्वामी मठात राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रेरणेने व मठसंस्थानचे मठाधिपती श्री श्री 108 शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार 16 ते 23 जानेवारी दरम्यान दररोज सप्तकोटी शिवपंचाक्षर महामंत्र जपयज्ञ, परमरहस्य ग्रंथाचे पारायण संपन्न होणार आहे.

दररोज पहाटे श्री गुरू हावगीस्वामी महाराजास विरभद्र स्वामी यांच्या हस्ते अभिषेक, 4 ते 6 शिवपाठ, 7 ते 9 परमरहस्य ग्रंथाचे पारायण, 9 ते 12 शिवपंचाक्षर जप, 3 ते 4 गाथा भजन, 4 ते 5 प्रवचन, सायंकाळी 6ते 7 शिवपाठ, 9 ते 11.30 शिवकीर्तन व शिवजागर आदी कार्यक्रम होणार आहेत. शिवकीर्तनामध्ये बुधवार 16 रोजी शि.भ.प. तानाजी पाटील थोटेवाडी, 17 रोजी शि.भ.प.गोरोबा काका शिवणे, 18 रोजी शि.भ.प. संगीता मसलगे रुई, 19 रोजी शि.भ.प. मन्मथप्पा डांगे गुरुजी, 20 रोजी शि.भ.प. काशिनाथप्पा सांगवे शि.अनंतपाळ, 21 रोजी शि.भ.प. भगवंत बाबा चांभरगेकर, 22 रोजी शि.भ.प. टाळआरती, शि.भ.प. उध्दव महाराज हैबतपुरे तर रात्री अखिल भारतीय विरशैव कीर्तनकार संघाचे अध्यक्ष शि.भ.प. शिवराजप्पा नावंदे गुरुजी यांचे कीर्तन तर बुधवार 23 जानेवारी रोजी श्री श्री 108 डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराजांचे महाप्रसादाचे कीर्तन होणार आहे. तसेच प्रवचन घाळेप्पा स्वामी नागलगाव, काशिनाथ स्वामी नागलगाव, रतिकांत स्वामी, कैलास जामकर, ओमकार मिरजगावे गंगाखेड, शिला मालोदे, शिवलिंग पाटील, काशिनाथ मारजवाडीकर, अशोक बिरादार वडगाव, सुर्यकांत पाटील थोटवाडी, चंद्रशेखर काळवणे, दैवशाला हळीघोंगडे, लक्ष्मीबाई श्रीमंडळे, वर्षा स्वामी लोहारा, गुणवंत काळगापुरे शि.जानापुर, दिलीप स्वामी, महादेव पाटील माळेवाडी, सतिष बिरादार, चंद्रकलाबाई आठाणे आदींचे प्रवचन होणार आहे.

22 जानेवारी रोजी परमरहस्य ग्रंथ व सप्तकोटी शिवपंचाक्षर जपाची सांगता होऊन सकाळी 11 वाजता शहरातून भव्य कलश शोभा यात्रा निघुन दुपारी ठीक 3 वाजता मंगल आरती होणार आहे. रात्री 2 वाजता ‘श्री’ची पालखी मिरवणूक निघून बुधवार 23 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजता आग्गी होईल तर सकाळी 11 वाजता डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराजांचे महाप्रसादाचे कीर्तन होणार आहे. श्री गुरू हावगी स्वामी यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित सत्संग कार्यक्रमाचा भाविक भक्तानी लाभ घेण्याचे आवाहन श्री गुरू हावगी स्वामी मठसंस्थानचे मठाधिपती डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज, यात्रा महोत्सव समितीचे व्यवस्थापक मंडळ माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, बाबीराव समगे, रामलिंग स्वामी, शिवराज नावंदे, सुभाष धनुरे ,उध्दव महाराज हैबतपुरे, बस्वराज कानमंदे, शिवराज पाटील, गुरुनाथप्पा धनुरे यांच्यासह मल्लीकार्जून कानमंदे, वैजनाथ उप्परबावडे, राजकुमार समगे, अशोक समगे, राजशैखर कानमंदे, गिरिष उप्परबावडे, हावगीस्वामी युवक संघ, श्री हावगीस्वामी गणेश मंडळ, श्री हावगीस्वामी महिला भजनी मंडळ, नवशा महादेव मंडळांनी केले आहे.