टी-20 त हसरंगा; वन डेत मेंडिस उपकर्णधार हिंदुस्थान दौऱयासाठी श्रीलंकेचा संघ जाहीर

 

 

 

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने गुरुवारी हिंदुस्थान दौऱयासाठी 20 खेळाडूंचा संघ जाहीर केला. 3 जानेवारीपासून सुरू होणाऱया या दौऱयासाठी दासून शनाकाकडे दोन्ही संघांचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. याचबरोबर अष्टपैलू वनिंदू हसरंगा टी-20 मालिकेत आणि कुशल मेंडिस वन डे मालिकेत संघाचा उपकर्णधार असेल. अनुभवी दिनेश चंदिमलला या दौऱयासाठी संघात स्थान मिळू शकले नाही.

राजपक्षे, तुषारा टी-20 खेळणार आहेत

20 खेळाडूंच्या संघात भानुका राजपक्षे आणि नुवानू तुषारा यांची केवळ टी-20 संघात निवड करण्यात आली, तर, जेफ्री वांडरसे आणि नुवानिडू फर्नांडो हे फक्त वन डे संघाचा भाग असतील. याशिवाय उर्वरित 16 खेळाडू दोन्ही मालिकेत संघाचा भाग असतील.

हिंदुस्थान दौऱयासाठी श्रीलंका संघ ः दासुन शनाका (कर्णधार), वनिंदु हसरंगा (टी-20 साठी उपकर्णधार), कुशल मेंडिस (वन डे उपकर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, सदिरा समरविक्रमा, चरिथा असलंका, धनंजय डिसिल्व्हा, अशेन भंडारा, महीश थिका, चर्मचिन्हे, अशेन भंडारा रजिथा, दिलशान मधुशंका, दुनिथ वेलागे, प्रमोदशन आणि लाहिरू कुमारा.

फक्त टी-20 संघात निवड ः भानुका राजपक्षे,नुवान तुषारा.

फक्त वन डे संघात निवड ः जेफ्री वांडरसे ,नुवानिडु फर्नांडो.