श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा झंझावात उरणमध्ये

1

सामना प्रतिनिधी, चिरनेर

मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा झंझावात जोरात सुरू आहे. आज या प्रचाराचा झंझावात उरणमध्ये दाखल झाला असून जासई येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून खासदार बारणेंचा प्रचार जोरात सुरू झाला आहे.

आज सकाळी 10 वाजता शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार खा. श्रीरंग बारणे याचा उरण तालुक्यातील प्रचार जासई येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून सुरू झाला. त्यावेळी जासईमध्ये भगवे वादळ असंआल्याचे चित्र दिसून येत होते. जासईमधून सुरू झालेली ही प्रचार फेरी धुतुम, चिर्ले, वेश्वि, दिघोडे, विंधणे, बोरखार, चिरनेर, कलंबूसरे, मोठी जुई, कोप्रोली, आवरे, वशेणी, खोपटे इत्यादी गावांमधून मोठ्या उत्साहात निघाली होती. जनतेच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे उरण तालुक्यातून मोठे मताधिक्य घेतील हे अधोरेखित झाले आहे.

या प्रचारफेरीमध्ये बारणे यांच्यासह जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, भाजपा नेते महेश बालदी,माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख रमेश म्हात्रे, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, भाजप तालुकाध्यक्ष रवी भोईर, तालुका प्रमुख प्रदीप ठाकूर, जयवंत पाटील, कमळाकर पाटील, जि. प. सदस्य विजय भोईर, उरण शहर प्रमुख विनोद म्हात्रे, भाजपाचे प्रशांत पाटील, नीलकंठ घरत, दिपक भोईर, पं. स. सदस्य दीपक ठाकूर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.