एचडीएफसीचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांचा मृतदेह सापडला

1

सामना ऑनलाईन । ठाणे

बुधवार सायंकाळपासून बेपत्ता झालेले एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या झाल्याचे उघड झाले होते. मात्र, सिद्धार्थ संघवी यांचा मृतदेह मिळाला नव्हता. पण, सोमवारी सकाळी कल्याण येथील मलंगगड परिसरातील ककडवाल गावाजवळ त्यांचा मृतदेह सापडला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याप्रकरणी चारजणांना ताब्यात घेतले असून त्यापैकी एकाने संघवी यांच्या हत्येची कबुली दिली होती. संघवी यांची कार कौपरखैरणे येथे सापडल्यानंतर त्यांचे बेपत्ता होण्याचे गूढ वाढले होते. त्यांचा सर्वत्र शोध सुरू असताना नवी मुंबई क्राइम ब्रँचने रविवारी सर्फराज खान नावाच्या इसमाला संघवी बेपत्ता प्रकरणात ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी ना. म. जोशी मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्यान, संघवी यांची हत्या केली असून त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात माझा सहभाग असल्याचे सर्फराजने नवी मुंबई पोलिसांना सांगितले. तसेच संघवी यांचा मृतदेह कल्याण येथे जंगलात फेकल्याचेही त्याने सांगितल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. संघवी यांचा मृतदेह मिळाल्याने या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. या प्रकरणी सर्फराजसह चार संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या चौघांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

summary- siddharth sanghvis deadbody found at kalyan