सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

सामना प्रतिनिधी । कुडाळ

कुडाळ येथील सार्वजनिक गणेशोत्सव सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात दि.13 ते 29 सप्टेंबर या कालावधीत विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात फुगडी, भजने, संयुक्त दशावतारी नाटक व जिल्हास्तरीय भजन स्पर्धा होणाार आहे. गणेशचतुर्थी दिवशी सकाळी 9 वा. श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.

कुडाळ पोस्ट ऑफिस जवळील स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयासमोरील पटांगणात सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना केली जाते. या गणेशोत्सवाचे यंदाचे 9 वे वर्ष असून 17 दिवस हा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. दररोज सकाळी धार्मिक विधी, आरती तसेच दि.13 ते 23 सप्टेंबर या कालावधीत दररोज सायं. 4 ते 6 वा. फुगडी, 6 ते 10 वा. भजनांचा कार्यक्रम होणार आहे. दि.24 ते 27 सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्र स्वाभिमान सिंधुदुर्ग पूरस्कृत सिंधुदुर्ग राजा जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रथम क्रमांक 11 हजार101 रू. द्वितीय 7 हजार777 रू, तृतीय 5,555 रू, उत्तेजनार्थ प्रथम 4001 रू, द्वितीय 3001 रू व तृतीय 2001 रू. तसेच वैयक्तिक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट हार्मोनियम वादक, पखवाज वादक, झांज वादक व कोरस यांना प्रत्येकी 1001 रू. आदी प्रत्येक सहभागी मंडळास मानधन स्वरूपात 1001 रू.देण्यात येणार आहे. प्रवेश फी 500 रू. असून दररोज पाच अशी एकूण 20 भजन मंडळांची भजने होणार आहेत. दि.28 सप्टेंबर रोजी सायं. 4 वा. मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण समारंभ पार पडणार आहे. दि.28 सप्टेंबर रोजी सायं.6वा. संयुक्त दशावतारी नाटक मंडळाचे दशावतारी नाटक सादर होणार आहे. दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी विधीवत पुजा, दुपारी महाप्रसाद त्यानंतर दु. 1 वा. श्री ची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. पावशी तलाव येथे श्री.चे विसर्जन केले जाणार आहे अशी माहिती सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे.