काँग्रेस कार्यकर्त्यापाठोपाठ गायक बुयाव यांनाही हवंय विमानतळ, भाजपची गोची

सामना वृत्तसेवा । पणजी

काँग्रेस कार्यकर्त्यापाठोपाठ प्रसिद्ध गायक सिद्धनाथ बुयाव यांनीही जनमत कौलाच्या सुवर्णमहोत्सव कार्यक्रमासाठी विमानतळाच्या परिसराची जागा द्यावी अशी विनंती केली आहे. ‘भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा झाली होती ती जागा कार्यक्रमासाठी मिळावी’, अशी मागणी बुयाव यांनी केली आहे. बुयाव यांनी दाबोळी विमानतळाची जागा मागितल्यामुळे शहा यांच्या सभेला अटकाव न करणाऱ्या विमानतळ प्राधिकरण समोरील अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.

लग्नासाठी काँग्रेस कार्यकर्त्याला हवं विमानतळ, भाजपची पंचाईत

बुयाव यांनी गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण होऊ नये म्हणून घेण्यात आलेल्या जनमत कौलाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमासाठी दाबोळी विमानतळाची जागा मिळावी म्हणून अर्ज केला आहे. कार्यक्रमासाठी व्यासपीठ, खुर्च्या, माइक सिस्टीमसाठी परवानगी मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

गोव्याचा दाबोळी विमानतळ हा प्रामुख्याने नौदलाच्या विमानांसाठी वापरला जातो. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने अतिशय संवेदनशील असलेल्या या विमानतळावरील मोकळ्या जागेत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना सभा घेण्यासाठी परवानगी दिल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.