ही डान्स स्टेप करण्यासाठी गायकाला अटक

सामना ऑनलाईन । रियाध

सौदी अरेबियातील एका गायकाला एका कॉन्सर्टमध्ये विशिष्ट डान्स स्टेप केल्याने त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या गायकाचं नाव अब्दल्लाह अल शाहानी असं या गायकाचं नाव असून तैफ या शहरात एका कॉन्सर्ट दरम्यान त्याने ही विशिष्ट स्टेप केली.

या स्टेपला डॅबिंग असं म्हटलं जातं. या स्टेपमध्ये एक हात दुमडून त्या दिशेने डोकं झुकवलं जातं. दोन वर्षांपूर्वी जन्माला आलेली ही डॅबिंग नामक स्टेप जगभरात अत्यंत लोकप्रिय असून अनेक सेलिब्रिटींनी या स्टेपवर नृत्य केलं आहे. मात्र, या सौदी अरेबियाच्या कायद्यानुसार ही स्टेप गांजाच्या व्यसनाशी निगडीत आहे. सौदी अरेबियाच्या गृहमंत्रालयाने नुकतीच ही स्टेप निषिद्ध ठरवली आहे. त्यामुळे शाहानीला ही स्टेप करण्यासाठी अटक करण्यात आली आहे.

शाहानी याने आपल्या डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर केला असून त्या स्टेपसाठी त्याने माफीही मागितली आहे. मला या बंदीची कल्पना नव्हती, नाहीतर मी ती स्टेप केली नसती, असा खुलासाही शाहानीने केला आहे.


Un chanteur saoudien arrêté pour avoir dabé… by pointdakar