सुनिधी चौहान झाली आई

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानची नवीन वर्षाची सुरुवात खूपच गोड झाली आहे. सुनिधीने १ जानेवारीला एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सूर्या रूग्णालयात संध्याकाळी ५.३० वाजता सुनिधीने मुलाला जन्म दिला. गायिका सुनिधी चौहान आणि संगीतकार हितेश सोनिक यांचे हे पहिलेच मूल असल्याने सध्या त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. आई व बाळाची प्रकृती ठणठणीत असल्याचे सूर्या रूग्णालयातील डॉक्टर रंजना धानु यांनी सांगितले.

वर्षाच्या सुरुवातीला सुनिधीने दिलेल्या या गोड बातमीमुळे तिच्या चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. बाळ होण्यापूर्वी तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, मी या बाळाला जन्म देण्यासाठी खूप उत्सुक आहे. २०१२ ला सुनिधी संगीतकार हितेश सोनिकसोबत विवाहवद्ध झाली. वयाच्या चौथ्या वर्षापासून सुनिधीने आपल्या गाण्याची करिअरची सुरुवात केली होती. तिने आतापर्यंत विविध भाषांमध्ये गाणी गायली आहेत.