जन्माष्टमीला दागिने चोरले, गोपाळकाल्याला सापडले; ठाणे पोलिसांची वेगवान कामगिरी

six-arrested-in-thane-for-r

सामना प्रतिनिधी । ठाणे

श्रीकृष्ण जन्माष्टमीला ठाण्याच्या कृष्ण मंदिरात चोरट्यांनी 35 लाख रुपयांचे दागिने चोरी केली. ठाणे पोलिसांनी अवघ्या आठ तासांत या चोरट्यांना अटक केली असून यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

कृष्ण मंदिरात जन्माष्टमीच्या वेळी दागिन्यांची चोरीकरून एक महिला आणि तिच्या पाच साथीदारांनी पळ काढला. याची माहिती ठाणेनगर पोलिसांना मिळताच त्यांनी अत्यंत वेगानं या चोरीचा तपास केला. अवघ्या आठ तासांत मुद्देमालासह या आरोपींच्या दिवा येथून अटक करण्यात आली. ठाणेनगर पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक होत आहे.

summary: six arrested in thane for robbery