तरुणांसाठी कौशल्य विकास व प्रशिक्षण

मुंबई ऊर्जा मार्ग या पारेषण पायाभूत सुविधा प्रकल्पाने मुंबईतील तरुणांसाठी काwशल्य विकास व प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यासाठी सिमेन्स ऐक्य एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर ट्रस्टसोबत सहयोग केल्याची घोषणा केली. सरकारच्या ‘कौशल भारत-कुशल भारत’ दृष्टिकोनाशी संलग्न असलेल्या या उपक्रमाचा 200हून अधिक तरुणांना प्रशिक्षित करण्याचा मनसुबा असेल. त्यांना नोकरीसाठी सुसज्ज करण्याच्या मनसुब्यासह हा प्रशिक्षण उपक्रम तरुणांना उद्योगाशी संबंधित काwशल्यांचे प्रशिक्षण घेण्याची संधी देईल, ज्यामुळे त्यांना स्थिर उदरनिर्वाह संधी मिळवण्यामध्ये साह्य होऊ शकते. या कार्यक्रमाचे उद्घाटन नेरळ येथे निनाद पितळे, प्रकल्प संचालक- मुंबई ऊर्जा मार्ग यांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी राजेश शर्मा, अविनाश भोपी, अशोक राणे, गिरीश अष्टेकर, हरेश धुळे उपस्थित होते.