झोपेचे शास्त्र

जागरण आरोग्यासाठी घातक आहे, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागू नये.

दिवसभर कामकाज केल्यानंतर रात्रीची झोप ही हवीच… पण ही झोपही कशी असली पाहिजे, झोपताना काय टाळलं पाहिजे हे माहीत असण्याची खूप गरज आहे. कारण अनेकदा झोपण्याच्या चुकीच्या सवयींमुळे जीवनात अपयश येत असते. पण हे फारसे कुणाला ठाऊक नसते. त्यासाठीच या काही टीप्स…

 • सुनसान घरात एकट्याने कधीच झोपू नये म्हणतात. मंदिर आणि स्मशानात कधीच झोपता कामा नये.
 • झोपलेल्या माणसाला अचानक जागे करू नये.
 • चाणक्यनीती सांगते की, विद्यार्थी, सहाय्यक आणि द्वारपाल यांनी जास्त वेळ झोपू नये.
 • आयुष्यवाढीसाठी भल्या पहाटे उठायला हवे. पूर्णपणे अंधार असलेल्या खोलीत झोपणे चुकीचे आहे.
 • भिजलेल्या पायांनी कधीच बिछान्यात जायचे नाही. सुक्या पायांनी झोपल्यास धन प्राप्त होते.
 • तुटलेल्या खाटेवर आणि उष्ट्या तोंडाने झोपणे महाभारतात वर्जित मानले गेले आहे.
 • नग्न होऊन कधीच झोपायचे नाही असे गौतमधर्मसूत्रात म्हटले आहे.
 • पूर्वेकडे डोके करून झोपले तर विद्या प्राप्त होते, तर पश्चिमेकडे डोके करून झोपल्याने चिंता वाढते. उत्तरेकडे डोके करून झोपाल तर हानी व मृत्यू संभवतो, तर दक्षिणेकडे डोके करून झोपल्यावर आयुष्य वाढते.
 • दक्षिण दिशेकडे पाय करून कधीच झोपू नये. तेथे यम आणि दृष्ट देवांचा निवास असतो. असे करणाऱ्याच्या कानात हवा शिरते म्हणतात. मेंदूमध्ये रक्तसंचार कमी होतो. त्यामुळे अशा लोकांना स्मृतीभ्रंश, मृत्यू किंवा वेगवेगळे विकार होऊ शकतात.
 • छातीवर हात ठेवून, छप्पराच्या खांबाखाली आणि पायावर पाय ठेवून कधीच झोपायचे नाही.
 • बिछान्यावर बसून खाणे-पिणे अशुभ मानले जाते.
 • झोपल्या झोपल्या अभ्यास करू नये.
 • कपाळावर टिळा लावून झोपणे अशुभ असते. त्यामुळे झोपताना टिळा काढून टाका.