५ हजार रुपयांपेक्षा कमी हप्त्यात मिळतात ‘या’ कार

सामना ऑनलाईन । मुंबई

दिवाळीनिमित्त तुम्ही जर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट कमी असेल, तर तुम्हाल परवडतील अशा बजेट कारही बाजारात उपलब्ध आहेत. महिन्याला ५ हजार रुपयांपेक्षाही कमी हप्ता भरुन या कार तुम्हाल खरेदी करता येणार आहेत. एक नजर टाकूया त्या बजेट कार्सवर…

मारुती अल्टो- ८००
हिंदुस्थानातील नंबर वन कार कंपनी मारुती सुझुकीची ही लोकप्रिय कार आहे. मारुती सुझुकीची ही सर्वात छोटी कार आहे. या कारची दिल्लीतील किंमत ३.२६ लाख रुपये आहे. ही कार खरेदी करण्यासाठी १ लाख रुपये डाऊनपेमेंट भरावं लागेल. त्यानंतर ५ वर्षासाठी ४,७१९ रुपये दर महिन्याला हप्ता भरावा लागेल.

alto-car

हुंडाई ईऑन
दक्षिण कोरियाच्या हुंडाई कंपनीच्या या कारची किंमत ३.२४ लाख रुपये आहे. ही कार खरेदी करण्यासाठी १ लाख रुपये डाऊनपेमेंट भरावं लागेल. त्यानंतर ५ वर्षासाठी ४६७७ रुपयांचा हप्ता दर महिन्याला भरावा लागेल.

eon-car

टाटा टीअॅगो
हिंदुस्थानी कार कंपनी टाटाची ही प्रसिद्ध कार आहे. टाटाने या कारला आपलं जुना लुक हटवून नवीन लूक दिला आहे. या कारची दिल्लीतील किंमत ३.२४ लाख रुपये आहे. ही कार खरेदी करण्यासाठी १ लाख रुपये डाऊनपेमेंट भरावं लागेल. त्यानंतर ५ वर्षासाठी ४६७७ रुपयांचा हप्ता दर महिन्याला भरावा लागेल.

tata-tiago

रेनॉल्ट क्विड
या कारची दिल्लीतील किंमत २.६५ लाख रुपये आहे. ही कार खरेदी करण्यासाठी ८० हजार रुपये डाऊनपेमेंट भरावं लागेल. त्यानंतर ८४ महिने २९९९ रुपयांचा हप्ता भरावा लागेल. तुम्हाला लोन कमी हप्त्यात फेडायचं असल्यास तीही सुविधा उपलब्ध आहे.

kwid-car

डॅटसन रेडी गो
या कारची दिल्लीतील किंमत २.४१ लाख रुपये आहे. ही कार खरेदी करण्यासाठी १ लाख रुपये डाऊनपेमेंट भरू शकता. त्यानंतर ३१४१ रुपयांचे ६० हप्ते दर महिन्याला भरावे लागतील.

redo-go-car