देश तोडण्याची भाषा करणाऱ्या तुकडे-तुकडे गँगसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी!

11
smriti-irani-slams-congress


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशद्रोहाचा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केल्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सिब्बल व काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. देश तोडणाऱ्यांसोबत काँग्रेसची ‘हात’मिळवणी असल्याचा टोला इराणी यांनी लगावला.

राममंदिर बांधण्याची भाजपची इच्छा नाही; ओमप्रकाश राजभर यांचा आरोप

‘काँग्रेस देश तोडण्याची भाषा करणाऱ्या टोळीचे समर्थन करत आहे. नुकतेच एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने देशद्रोहाचा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी केली. तसेच त्यांचे अध्यक्ष (राहुल गांधी) या तुकडे-तुकडे गँगची भेट घेण्यासाठीही गेले होते. मी आता त्यांना देशातील जनतेमध्ये जाऊन त्यांचे समर्थन करण्याचे आव्हान देते’, असे स्मृती इराणी यावेळी म्हणाल्या.

अमित शहांवर म्हणाल्या…
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले होते. कर्नाटकात ढवळाढवळ केल्याने शहांना डुकराचा रोग झाल्याचे काँग्रेस नेते म्हणाले होते. यावर बोलताना इराणी म्हणाल्या की, काँग्रेसने याआधीही शहांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. त्यांना उपहासही उडवला आहे, परंतु त्यांनी फेकलेल्या दगडांवर चढून त्यांनी यशाची शिडी चढल्याच्या इराणी म्हणाल्या.

आरएसएसच्या वक्तव्यावर मौन
राम मंदिरासाठी आरएसएसने भाजपवर दबाव वाढवला आहे. सहकार्यवाह भैयाजी जोशी यांनी 2025 पर्यंत राम मंदिर पूर्ण व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा इराणी यांनी याबाबत पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्षाने आमची भूमिका स्पष्ट केले आहे. राम मंदिरासाठी भाजप प्रतिबद्ध असून आरएसएसच्या वक्तव्यावर अधिक बोलू शकत नाही, असे म्हणत इराणी यांनी मौन बाळगले.

आपली प्रतिक्रिया द्या