देशात कुणी ऐकत नाही म्हणून विदेशात बोलतात – स्मृती इराणी

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

राहुल गांधींचे हिंदुस्थानात कुणी ऐकत नाही म्हणून ते विदेशात जाऊन बोलतात. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी स्वतःच्या राजकीय अपयशाचा पाढा वाचला आहे, अशी टीका केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे. राहुल गांधी हे पंतप्रधान मोदींवर नेहमीच टीका करतात, यात काहीच आश्चर्य नाही. हिंदुस्थानची लोकशाही गुणवत्तेवर चालते, घराणेशाहीवर नाही. राहुल गांधी स्वतः एक नापास वारसदार आहेत. संपूर्ण देशावर घराणेशाहीचा आरोप करून जनतेचा अपमान केल्याचेही स्मृती इराणी यांनी सांगितले.