पनवेलच्या न्यायाधीशांना कोर्टातच डसला साप, न्यायालयात घबराट

सामना प्रतिनिधी । पनवेल

पनवेल न्यायालयाचे न्यायाधिश सी.पी.काशीद यांना आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कोर्टात साप चावल्याची घटना घडली. धामण जातीचा साप असल्याचे सांगितले जात आहे. सर्प मित्र वकिल दीपक ठाकूर यांनी स्वतः हा साप पकडला.

आज सकाळी नेहमी प्रमाणे न्यायाधीश सी.पी.काशीद नेहमी प्रमाणे आले होते. कोर्टात आल्यानंतर ते दालनात बसले. अवघ्या काही वेळातच काशीद यांच्या हाताला साप चावला आणि न्यायालयाच्या आवारात गोंधळ सुरू झाला. या घटनेची माहिती वकील आर.के. पाटील यांना मिळताच त्यांनी सर्प मित्र वकील दीपक ठाकूर यांना बोलावले आणि त्यांनी साप पकडला. हा साप बिनविषारी असल्याचे समजल्यानंतर न्यायाधिश आणि इतर वकिलांचा जीवात जीव आला.