सलमान खानला सर्पदंश, रात्री तीन वाजता रुग्णालयात दाखल

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला त्याच्या पनवेलच्या फार्महाऊवर साप चावला आहे. शनिवारी रात्री तीनच्या सुमारास ही घटना घडली असून त्याला तत्काळ कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार घेऊन सलमान सकाळी नऊच्या सुमारास त्याच्या फार्म हाऊसवर परतला.

सलमान हा अनेकदा सुट्टयांमध्ये त्याच्या कुटुंबासोबत पनवेलच्या फार्महाऊसवर जात असतो. शनिवारी देखील ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी त्याचे संपूर्ण कुटुंब या फार्महाऊसवर एकत्र आले होते. रात्री पार्टीदरम्यान सलमानला एक साप चावला. त्यानंतर सलमानच्या बॉडीगार्डने त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले.