आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध सामाजिक उपक्रम

85
aaditya

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज 13 जून रोजी वाढदिवस असून त्यानिमित्त राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वाढदिवसानिमित्त होर्डिंग लावू नयेत असे आवाहन करतानाच आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण विषयक तसेच समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची सूचनाही केली होती. त्याला प्रतिसाद देत राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वाढदिवसानिमित्त ‘मातोश्री’ निवासस्थानी आदित्य ठाकरे शिवसैनिक तसेच युवासैनिकांकडून देण्यात येणाऱया शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निवासस्थानी ते उपलब्ध असतील, असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या