काही तथ्यं

  • वर आणि वधू यांचं गोत्र एकच असेल तर त्यात लग्न करत नाहीत. कारण जवळच्या नातलगांचे जीन्स वेगळे होऊ शकत नाहीत. तसं केल्यास अनेक आजार वाढण्याची शक्यता असते.
  • आपल्या देशात बहुतांश धर्मांमध्ये कान टोचण्याची परंपरा आहे. कारण म्हटलं जातं की यामुळे विचार करण्याची क्षमता वाढते. समोरची व्यक्ती बोलते ते कानांतून थेट मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या नसा यामुळे जागृत होतात.
  • महिलांनी कपाळावर कुंकू लावणे अभिमानाचे आणि परंपरेचेही आहे. यामुळे चेहऱ्यावरील त्वचेला रक्तपुरवठा करणाऱ्या पेशी सक्रिय होतात आणि टिळा लावणाऱ्या व्यक्तीच्या अंगठ्यावरही दबाव पडल्याने त्यालाही फायदा होतो.
  • हात जोडून नमस्कार करणे हे खरं तर विनम्रतेचं लक्षण आहे. पण यामुळे अक्युप्रेशर होऊन त्याचा परिणाम सरळ आपल्या डोळ्यांवर, कानांवर आणि मेंदूवर होत असतो. हात मिळवून स्वागत करण्यापेक्षा हात जोडून स्वागत केल्याने आपल्या हाताचे किटाणू दुसऱ्याच्या हाताला लागत नाहीत असाही एक समज आहे.
  • जमिनीवर बसून जेवणे ही एक चांगली गोष्ट आहे. कारण तसं वागणं आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार आहे. मांडी घालून बसल्यामुळे मेंदू शांत राहातो. जेवताना मेंदू शांत असेल तर पचनक्रिया सुलभ होते.
  • जेवणाची सुरुवात तिखट खाद्यपदार्थांनी करतात आणि शेवट गोड खाऊन करतात. यामागेही तथ्य आहे. प्रथम तिखट खाल्ल्याने आपल्या पोटात आम्ल सक्रीय होते. त्यामुळे खाल्लेले पदार्थ चांगले पचतात. शेवटी गोड खाल्ल्यामुळे पोटातील त्याच आम्लाची तीव्रता कमी होते.
  • पिंपळाची पूजा केल्याने भुताटकी नाहीशी होते असा समज आहे. वास्तविक झाडांचा सन्मान करण्यासाठी पिंपळाची पूजा केली जाते. कारण रात्रीच्या वेळी झाडे ऑक्सिजन सोडतात. माणसासाठी तो खूप महत्त्वाचा असतो. म्हणून झाडे न तोडता त्यांचे संवर्धन केले पाहिजे हा यामागचा हेतू आहे.
  • दक्षिणेकडे डोके ठेवून झोपणे आपल्याकडे चुकीचे मानले जाते. कारण लोकांच्या म्हणण्यानुसार दक्षिणेकडे पाय करून झोपल्यास वाईट स्वप्न पडतात. वास्तविक जेव्हा आपण उत्तरेकडे डोके करून झोपतो तेव्हा आपले शरीर पृथ्वीच्या चुंबकीय तरंगांच्या सरळ रेषेत येतात. त्यामुळे शरीरातील लोह मेंदूच्या दिशेने जाते. यामुळे अल्झायमर, पर्किन्सन किंवा मेंदूशी संबंधित विकार उद्भवतात.