समाज घडवणारी माणसे काही प्रवृत्तींना नको आहेत!

dabholkar-and-pansare-photo

सामना ऑनलाईन, मुंबई

दिवंगत सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येवरून असे दिसते की, समाजातील काही प्रवृत्तींना समाज घडवणारी माणसे नको आहेत. काही वेळेला या मार्गाने आवाज बंद केला जातो तर काही वेळा पक्ष संघटना फोडून विविध विचारधारांमध्ये नेऊनही आंदोलनाची धार कमी करण्याचे प्रकार होत आहेत, अशी टीका शिवसेनेने आज केली.

राज्य व केंद्र सरकारमधील तात्त्विक लढाईमध्ये कोणती भूमिका घ्यायची याचे स्वातंत्र्य माध्यमांना नक्कीच आहे. एखाद्या जिल्हय़ात शेतकरी आत्महत्या झाली तर त्याची बातमी लगेच होते. पण त्या कुटुंबीयांचे पुढे काय झाले आहे हे कळत नाही. शेतकऱयांनी शांततामय मार्गाने केलेल्या आंदोलनाची बातमी झाली पाहिजे, जी आता केली जात नाही. जिथे शक्य आहे तिथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची नंतरच्या सकारात्मक स्थितीची माहिती दिली तर इतरांच्या मनात नक्कीच आशावाद तयार होईल, असे शिवसेना प्रवक्त्या व उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे त्यांनी म्हटले आहे. ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मीडिया कानाडोळा करतोय का,’ या विषयावरील मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात नीलम गोऱहे यांच्या अध्यक्षतेखाली आज शेगाव येथे सकाळी परिसंवाद झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

गुन्हय़ांचे उदात्तीकरण थांबवा!

अलीकडच्या काळात जागतिकीकरणाचा परिणाम माध्यमांवरही झाला आहे. रात्री ११ वाजल्यानंतर सनसनाटी, भीतीदायक व गुन्हय़ांचे उदात्तीकरण करणाऱया बातम्या दाखवल्या जातात. त्यांना आळा घातला पाहिजे. विविध गुन्हय़ांच्या चित्रीकरणाची मागणी प्रेक्षक करतात का, असा सवाल त्यांनी केला.