मेहनत करून देखील पैशांची चणचण आहे? मग हे वाचा

प्रातिनिधीक फोटो

anupriya-desai-astrologer>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद)

मनुष्याच्या जीवनावश्यक गोष्टी तीनच – अन्न,वस्त्र आणि निवारा. गोष्टी जरी तीनच असल्या तरी त्या मिळवण्यासाठी आयुष्यभर आटापिटा करावं लागतो, वणवण फिरावे लागते. एवढे कष्ट करूनही काही जणांना अन्न आणि वस्त्र एवढ्यावरच समाधान मानावे लागते. काहींना तर ते सुद्धा मिळवितांना त्रास होत असतो. काहीजण इतके नशीबवान असतात की त्यांना फार कष्ट न करताही सर्व गोष्टी मिळत असतात. हा फरक का? तुमच्या जन्मकुंडलीवरून तुम्ही किती धन कमवणार आणि किती धनवान होणार? ह्याची शक्यता वर्तवता येते. व्यक्तिच्या सांपत्तिकस्थितीची कल्पना येऊ शकते. चांदीचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्या लोकांना पैशांची वानवा काय असते त्याची कल्पना येणार नाही. ज्यांना दिवसरात्र काबाडकष्ट करूनही पदरात फारसे काहीच पडत नाही त्यांना ह्या लेखाचा जरूर उपयोग होईल अशी अशा आहे.

कुंडलीतील धन स्थान म्हणजेच कुटुंब स्थान. आपले कुटुंब हीच आपली धनसंपत्ती आणि ह्या धनसंपत्तीला जपण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे हे आपले कर्तव्य. आपल्या कुंडलीत ह्या स्थानामध्ये जर

१) शुभ ग्रह असतील आणि दशा -अंतर्दशाही पूरक असतील तर सांपत्तिक स्थिती चांगली असते.

२) धनस्थानात शुक्र,चंद्र,बुध असे ग्रह असणे.

३) धनेश लाभ स्थानात असणे,षष्ठ स्थानात असणे,दशम स्थानात असणे हे शुभ होय.

४) ज्या व्यक्तींचा धनेश बाराव्या स्थानात असतो त्यांच्याकडे पैसे टिकत नाही. कितीही प्रयत्न केले तरी ह्या ना त्या कारणाने पैसे खर्च करावेच लागतात आणि शेवटी गाठीला काहीच उरत नाही.

५) गुरू ह्या ग्रहाची दृष्टी द्वितीय स्थानांवर असणे शुभ.

६) ह्याच बरोबरीने महादशाही पोषक असेल तर तुम्हांला चांगली सांपत्तिक स्थिती लाभते.

हे तर झाले कुंडलीच्या योगांबाबत. काहींच्या कुंडलीत तर असे योग असतात की सुरुवातीची काही वर्षे खूप चांगली असतात परंतु नंतर मात्र अचानक काही कारणामुळे परिस्थिती ढासळायला लागते. सांपत्तिक स्थिती टिकवण्यासाठी आज काही सोपे उपाय देत आहे, त्याच्या आपण आवश्य उपयोग करून घ्या.

पुढील उपाय करून पाहा

१) श्री सूक्त हे स्तोत्र दररोज संध्याकाळी वास्तुत म्हणावे.

२) वास्तु नेहेमी स्वच्छ ठेवावी.

३) घरात टॉयलेट आणि बाथरूमचे दरवाजे नेहेमी बंद असावेत.

४) तिन्हीसांजेला देवासमोर निरांजन तेवत असावे.

५) वास्तुत कुठल्याही प्रकारची दुर्गंधी असू नये. त्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा. आपल्याला आवडत असलेल्या एखाद्या अत्तराचे काही थेंब पाण्यात घालून ते पाणी वास्तूत शिंपडावे.

६) वास्तुत कापूर अवश्य प्रज्वलित करावा.

७) वास्तुच्या एखाद्या कोपऱ्यात जडे मीठ काचेच्या वाडग्यात ठेवून द्यावे. १५ दिवसांनी हे मीठ टॉयलेटमध्ये फ्लश करावे आणि नवीन मीठ ठेवावे.

८) वास्तुत कलह-वाद करू नयेत.

९) पुढील मंत्राचा उच्चार संध्याकाळी अकरा वेळेस करावा – ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ॥

ह्या उपायांचा अंमल श्रद्धेने करावा. बाकी उपाय हे तुमच्या कुंडलीनुसार सुचविता येतील. हे उपाय नक्की अनुभवा आणि मला प्रतिक्रिया जरूर कळवा.

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा: [email protected]

संपर्कसाठी मोबाईल क्रमांक- ९८१९०२१११९ (फक्त संध्याकाळी ६ ते ८ यावेळातच फोन करणे)