पोट साफ होण्यासाठी काही खास टिप्स…

– एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस, एक चमचा आल्याचा रस आणि दोन चमचे मध मिसळून रिकाम्यापोटी प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

– पेनकिलर, डिप्रेशन, उच्च रक्तदाब तसेच इतरही काही औषधे घेतल्याने बद्धकोष्ठतेचा विकार जडू शकतो.

– रात्री झोपण्यापूर्वी दोन चमचे गुलकंद खाऊन त्यावर एक ग्लास गरम दूध प्यावे. हा उपाय आठवडाभर करावा. यामुळे पचनशक्ती सुधारते.

– मनुके ग्लासभर दुधात घालून दूध उकळवावे. रात्री झोपताना त्या चावून खाव्यात त्यावर गरम दूध प्यावे. असे केल्यास जुनाट बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

– रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यात थोडेसे इसबगोल मिसळून प्या.

– मोड आलेल्या कडधान्यांमध्ये फायबर असते. यामुळे बिघडलेली पचनशक्ती सुधारून अन्नपचन योग्य पद्धतीने होते. शरीरिक क्रिया सुरळीत होण्यात मदत होते.

– जेवल्यानंतर पोट जड वाटत असेल तर पुदिन्याची ताजी पाने चावून खा किंवा पुदिन्याची पाने घातलेला चहा प्या.यामुळे पचनक्रियेशी संबंधित तक्रारींत आराम मिळतो.

– भाजलेल्या जिऱयाची एक चमचा पावडर ताकात मिसळून प्या.गॅस, अपचनापासून सुटका होईल.

– जास्त प्रमाणात खाल्ल्याने अपचन होऊन गॅसची समस्या उद्भवते. अशावेळी मेथीच्या दाण्यांमध्ये काळे मीठ मिसळून हे दाणे खा. बद्धकोष्ठतेवर हा रामबाण उपाय आहे.

– एक ग्लास पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळून प्या. अपचन निघून जाईल.

– पोटात गॅस झाल्यास आल्याचा छोटा तुकडा हळूहळू चावावा. त्याचा रस चाखावा. १५ मिनिटांतच गॅसची समस्या दूर होते. नियमित असे केल्यास गॅसची समस्या निर्माण होणार नाही.