जेवण न दिल्याने मुलानेच केली आईची हत्या

21


सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

जिल्ह्यातील मूल तालुक्यात मुलानेच आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कमलाबाई बाबुराव दुर्योधन (वय 62) हिची दगडाने ठेचून तिच्याच मुलाने हत्या केल्याची घटना शहरात घडली. ते दोघे मूल शहरातील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतीगृहामागील परीसरात झोपडीत राहत होते. आईने भिक मागून जेवण दिले नाही या कारणावरून रविवारी रात्री 10 वाजता धिरज बाबुराव दुर्योधन याने आईची दगडाने ठेचून निर्घृन हत्या केली. तीन तासाच्या आत मूल पोलीसांनी तपास करून आरोपीला ताब्यात घेतले.

आरोपी धिरज मानसीक रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. धिरज शहरात दिवसभर फिरून आल्यावर रात्री आईला शिवीगाळ, मारहाण करत होता. आईने भिक मागून जेवण दिले नाही म्हणून रविवारी रात्री त्याने आईच्या डोक्यात दगड मारून हत्या तिची केली. त्याच्यावर 302 कलमाखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेंडे व मूल पोलीस करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या