सोनाली बेंद्रेने न्यूयॉर्कमध्ये अशी साजरी केली दिवाळी

1

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात आपण पती व मुलाबरोबर दिवाळी साजरी करत असल्याचं तिनं म्हटलं आहे.

सोनालीने दिवाळीच्या क्षणांचे ३ फोटो शेअर केले आहेत. त्याखाली मुंबईच्या तुलनेत न्यूयॉर्कमध्ये खूप उशीरा दिवाळी सुरू झाल्याने जरा उशीराने शुभेच्छा देत असल्याचं तिनं म्हटलं आहे. तसेच येथे आमच्याकडे हिंदुस्थानी कपडे नव्हते. यामुळे आम्ही थोडक्यात पूजा आटोपली. पण हे सगळं मनापासून केल्याचं तिनं म्हटलं आहे. तसेच तिने सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या आहेत. तुम्हा सगळ्यांना हे वर्ष सुख समृद्धीचे जावो. आशा करते तुम्ही सगळ्यांनी आपल्या कुटुंबीयांबरोबर व मित्रपरिवाराबरोबर दिवाळी साजरी केली असेल असेही सोनालीने या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच लवकरच नवीन पु्स्तकाची घोषणा करणार असल्याचं तिने सांगितल आहे. गेल्यावेळी कॅमोथेरपीमुळे माझ्या दृष्टीवर परिणाम झाला होता. त्यामुळे मला स्पष्ट दिसत नव्हतं. वाचता येत नव्हतं. पण आता सगळं ठीक असून ‘अ लिटिल लाइफ’ हे अवॉर्ड विनर पुस्तक मी वाचणार आहे. असं सोनालीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.