आमदार राम कदम यांच्यावर सोनाली बेंद्रेचे पती भडकले, वाचा सविस्तर

सामना ऑनलाईन । मुंबई

महिलांवर आक्षेपार्ह वक्तव्य करून अडचणीत आलेले राम कदम यांनी जिवंतपणीचे अभिनेत्री सोनाली बेंद्रेला श्रद्धांजली अर्पण केली. अर्ध्या तासानंतर त्यांनी ही चूक लक्षात आली आणि माफी मागून त्यांनी हे ट्विट काढून टाकले. या प्रकरणी सोनाली बेंद्रेचे पती गोल्डी बेहेल हे नाराज झाले असून त्यांनी ट्विट करून सोशल मिडियाचा वापर सांभाळून करण्याचा सल्ला दिलेला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी राम कदमांचे नाव घेणे टाळले आहे.

राम कदमांची घसरगुंडी सुरूच… अभिनेत्री सोनाली बेंद्रेला वाहिली श्रद्धांजली

बेहेल म्हणाले की “सर्वांना सोशल मिडिया जबाबदारी वापरण्याचे मी आवाहन करतो. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, त्या पसरवू नका. त्यामुळे संबंधित लोकांच्या भावना दुखावतात. धन्यवाद”

राम कदम यांनी अर्ध्या तासानंतर श्रध्दांजलीचे ट्विट काढून टाकले आणि याबद्दल माफी मागितली. पण नेटकर्‍यांच्या प्रक्षोभाला त्यांना यामुळे पुन्हा सामोरे जावे लागले.

Video: तुमच्यासाठी मुलगी पळवून आणेन, भाजप आमदार राम कदम यांचं बेताल वक्तव्य