कर्करोगाबद्दल जनजागृती गरजेची!


सामना ऑनलाईन । मुंबई

कर्करोगासारख्या आजारांचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात झाल्यास आणि सामाजिक स्तरावर याविषयी व्यापक जागृती केल्यास उत्तम आरोग्य राखण्यासाठी मदत होईल, असे मत कॅन्सरशी यशस्वी झुंज देणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने नुकतेच व्यक्त केले.

कॉन्सॉर्शिअम ऑफ ऑक्रिडिटेड हेल्थकेअर ऑर्गनायझेशन्स (कॅहोकॉन2019)या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत ती बोलत होती. शरीर विशिष्ट कालावधीने देत असलेले संदेश समजून घेणे व योग्य निदान करून घेणे महत्त्वाचे आहे. वेळीच निदान झाल्यास वेदनादायी ठरणारे उपचार नंतर टाळणे शक्य होऊ शकते. कर्करोगासारख्याआजारांवर मोकळेपणे चर्चा केल्यास मोठया प्रमाणात जनजागृती होऊ शकते. रुग्णालयासारख्या आरोग्यसेवा देणाऱ्या संस्थांनी याबाबतीत महत्त्वाची भूमिका बजावायला हवी,असेही सोनाली पुढे म्हणाली.