सोनाली साकारणार सुलोचनादीदींची भूमिका

sonali-sulochana

सामना प्रतिनिधी । मुंबई

व्हॉयकॉम 18 प्रॉडक्शनच्या आगामी ‘आणि काशिनाथ घाणेकर’ या सिनेमाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. या सिनेमात अभिनेता सुबोध भावे नटश्रेष्ठ काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिनेमात ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांची भूमिका हरहुन्नरी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारणार आहे. नुकतेच या सिनेमाचे एक पोस्टर सोशल मिडीयावर व्हायरल झाले असून या पोस्टरमध्ये सोनालीची या सिनेमातील झलक पाहायला मिळत आहे. ‘ज्यांच्याकडे बघून नेहमीच चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते, ज्यांचा आशीर्वाद मिळाला की आईचा हात पाठीवर आहे असं वाटतं, त्या आमच्या सर्वांच्या आदराचं स्थान… सुलोचना दीदी. असे कॅप्शन देत सुबोधने या सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे.