सोनम कपूरने उघड केली बेडरूममधील गुपितं


सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडची स्टाईल आयकॉन अभिनेत्री सोनम कपूर हिचे 4 महिन्यांपूर्वी आनंद आहुजा याच्याशी लग्न झाले. मे महिन्यात सोनमने बॉयफ्रेंड आनंदशी लग्न केले. लग्नानंतर दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि फोटो व अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत असतात. एकमेकांचा सहवास दोघेही एन्जॉय करताना फोटोतून दिसत आहे.

लग्नानंतर तिसऱ्याच महिन्यात सोनम कपूर पतीला म्हणाली, मला तुझा खून करायचाय…

दरम्यान, लग्नानंतर सोनम कपूरने आपल्या बेडरूममधील गुपितं उघड केली आहेत. सोनमने नुकत्याच अनीता श्रॉफ अदाजानियाचा टॉक शो ‘फीड अप विद द स्टार्स’मध्ये हजेरी लागवी. यात तिने आपल्या वैयक्तीक आयुष्यातील अनेक गुपितं उघड केली आहेत. यावेळी सोनमने मी माझ्या आयुष्यात खूप आनंदही असून एन्जॉय करत असल्याचे सांगितले.

समलैंगिक संबंधांना परवानगी; बॉलिवूडकरांना आनंद, सोनम कपूरचे डोळे पाणावले

शोदरम्यान सोनमने अनेक गुपितं उघड केली. रात्री बेडरूममध्ये लाईट बंद करून झोपते की चालू ठेऊन असा प्रश्न विचारल्यावर ती म्हणाली की, नाही, लाईट बंद करत नाही. आम्हाला लाईट सुरू ठेवणे आवडते. तसेच सोनमला सहकलाकारांपैकी कोणाला मारलं आहे की असं विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, आयुष्मान खुराना आणि शाहीद कपूरला मारलं आहे. का? असं विचारल्यावर ती म्हणाली की, हे दोघं डोक्यावरील केस व्यवस्थित करण्यासाठी खूप वेळ घेतात म्हणून मारलं होतं.

तसेच सोनमला पती आनंद आहुजाने कसे प्रपोज केलं असा प्रश्न विचारला तेव्हा ती म्हणाली की, त्याने एकदम वेगळ्या अंदाजात मला प्रपोज केले होते. प्रपोजसाठी तो रिंग घेऊन आला होता आणि रिंग न घालताच प्रपोज केले होते.