सोनमची डेनिम साडी

मुंबई – बॉलिवूडची ग्लॅम डॉल सोनम कपूर ही कायम तिच्या आधुनिक पेहरावांमुळे चर्चेत असते. सोनम अभिनयातील उंची गाठू शकली नसली तरी ती तिच्या फॅशन स्टेटमेंटमुळे जगभरात प्रसिद्ध झाली आहे. मग तिचा रेड कार्पेटवरील अपिअरन्स असू दे की एअरपोर्टवरील लूक असू दे सोनम म्हटलं की फॅशनची चर्चा तर होणारच.

फॅशनमध्ये वेगवेगळे प्रयोग करणारी सोनम शुक्रवारी ‘डेनिम साडी’ या वेगळ्याच प्रकारच्या साडीमध्ये दिसली. डेनिमच्या कपड्यात आतापर्यंत आपण फक्त जीन्स, स्कर्ट, टॉप, कुर्ता या प्रकारचेच कपडे बघितले होते पण डिझायनर मसाबा गुप्ताने खास सोनमसाठी डेनिमच्या कपड्याची साडी तयार केली. शुक्रवारी सोनम ही खास डेनिम साडी घालून विकास बेहलच्या पार्टीला आली होती. डेनिम साडी, त्यावर मोठे गोल कानातले आणि मस्टर्ड कलरची स्लिंग बॅग अशा सिंपल लूकमध्येही सोनम अगदी सिझलिंग दिसत होती.