लग्नानंतर तिसऱ्याच महिन्यात सोनम कपूर पतीला म्हणाली, मला तुझा खून करायचाय…

8


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूडची फॅशन आयकॉन आणि कपुरांची लाडकी सोनम कपूर हिचे तीन महिन्यांपूर्वी 8 मे रोजी आनंद आहुजा याच्यासोबत लग्न झाले. लग्नापूर्वी हे दोघे कपल सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव होते व एकमेकांची खेचण्याची संधी कधी सोडत नव्हते आणि लग्नानंतरही दोघांमधील ही केमिस्ट्री तशीच आहे.

आनंद आहुजाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे सोनम कपूरला प्रश्न विचारला होता. आनंदने इन्स्टाग्रावर एक फोटो व स्टोरी पोस्ट करून त्यात सोनमला टॅग केले होते आणि विचारले की, ‘सोनम तुला माझ्या मिशा आठवात का?’ आनंदच्या या प्रश्नाला सोनमने देखील तात्काळ उत्तर दिले आणि म्हटले, ‘मला तुझा खून करावा वाटतोय.’

नक्की काय होते या फोटोत?
आनंदने जो फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता यात आनंदचे एक ओळखपत्र दिसत असून सोबत एक जुना फोटो दिसत आहे. ज्या फोटोत त्याला मिशा दिसत आहेत. हा फोटो पाहून सोनमने मजेशीरपणे मला तुझा खून करावा वाटतोय असे म्हटले आहे.

sonam-kill-you

आपली प्रतिक्रिया द्या