सुपरमॅन होण्याचा प्रयत्न करू नका!

6

सामना ऑनलाईन । दुबई

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपरमॅन होण्याचा प्रयत्न करू नका तर दबावात खेळ उंचावण्यासाठी प्रयत्न करा, क्रिकेटवर फोकस करा असा लाखमोलाचा सल्ला दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने संघसहकाऱ्यांना दिला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रत्येक विश्वचषक स्पर्धेत ‘चोकर्स’ म्हणून हिणवले जाते. महत्त्वाच्या सामन्यात मोक्याच्या वेळी हा संघ नेहमीच कच खातो. आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेला एकदाही विश्वचषक स्पर्धेची फायनल गाठता आलेली नाही, तर चार वेळा हा संघ सेमीफायनलमध्ये हरला.

डू प्लेसिस म्हणाला, मागील सर्व विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू सुपरमॅनसारखे खेळण्याचा प्रयत्न करत होते. गरज नसताना काहीतरी विशेष करण्याच्या नादात आम्ही नेहमी पराभवाला सामोरे गेलो. विश्वचषक स्पर्धेत आम्ही अद्याप लौकिकास साजेशी कामगिरी करू शकलो नाही. प्रत्येक वेळी दबावात आमच्या कामगिरीवर परिणाम झाला असा इतिहास आहे, ही आठवणही त्याने करून दिली. मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करा, प्रत्येकाला आपल्या खेळातील ताकदीचा अंदाज असायला हवा अशा शब्दांत डू प्लेसिसने सहकाऱ्यांचे कान टोचले.

आपली प्रतिक्रिया द्या