मायावती आणि अखिलेश यांनी युतीत काँग्रेसला का घेतलं नाही ? वाचा सविस्तर

64

सामना ऑनलाईन, लखनऊ

2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी अखिलेश यादव यांचा पक्ष समाजवादी पार्टी आणि मायावती यांचा पक्ष बहुजन समाज पक्ष एकत्र आले आहेत. भाजपला धक्का देण्यासाठी तयार झालेल्याया आघाडीमुळे काँग्रेसलाही हादरा बसणार आहे. देशात लोकसभेच्या सगळ्यात जास्त  जागा असलेल्या उत्तर प्रदेशात या दोन पक्षांना सोबत घेण्याचा काँग्रेस प्रयत्न करीत होती. मात्र अखिलेश आणि मायावती या दोघांनीही काँग्रेसला आम्ही सोबत घेणार नाही असं सांगितलं आहे. या आघाडीमुळे सत्ता राखण्यासाठी भाजपची आणि सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसची  बरीच दमछाक होणार आहे.

मायावती आणि अखिलेश यादव या दोघांनी आज एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये मायावती यांनी कोणी प्रश्न विचारण्याआधीच काँग्रेसला सोबत का घेतलं नाही याचं उत्तर देऊन टाकलं. हिंदुस्थानात बहुतांश काळ काँग्रेसचे राज्य होते. काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार आणि बेरोजगारी वाढली, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची विचारसरणी आणि कार्यशैली एकसारखीच आहे. संरक्षण क्षेत्रात दोन्ही पक्षांनी घोटाळा केला आहे आणि काँग्रेससोबत लढल्याने आण्हाला कोणताही फायदा होत नसल्याने आम्ही त्यांना आघाडीत घेतलं नाही” असं मायावती म्हणाल्या आहेत. असं असलं तरी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघांमध्ये आम्ही आमचे उमेदवार उतरवणार नाही असं दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी सांगितलं आहे. आई आणि मुलाचा विजय सुकर व्हावा यासाठी दोन्ही पक्षांनी ठरवून उचललेलं हे पाऊल आहे.

आपली प्रतिक्रिया द्या