स्पंदन लवकरच

ज कौटुंबिक संवाद हरवलाय. त्याचे पडसादही कुटुंबात उमटत असतात. नात्यातील आत्मीयता, ओलावा यावर भाष्य करणारा ‘स्पंदन व्हॉट इज रिलेशनशिप’ हा चित्रपट १५ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट हास्य फुलवणारा आणि तीन पिढ्यामधील नात्यांचे पदर उलगडणारा असल्याचे चित्रपटाचे निर्माते शैलेश कुलकर्णी सांगतात. लेखन-दिग्दर्शन शैलेश कुलकर्णी यांनी केले आहे. यात मोहन जोशी, अविनाश नारकर, सागर कारंडे यांच्यासह प्रसन्न पवार, वैशाली शहा आणि शैलेश कुलकर्णी यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.