बोलणे माझा स्वभाव नाही, काम करून दाखवणार – सुधाकर शृंगारे

181

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूरला बारा महिने पाणी आणि नांदेड ते गुलबर्गा ही रेल्वे लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे हा माझा पहिला अजेंडा आहे. त्यासाठी काय करायचे याचा पूर्ण आराखडा माझ्याकडे तयार आहे. माझा बोलण्याचा स्वभाव नाही. त्यामुळे मी आज काही अधिक बोलणार नाही. मतदारांनी दाखवलेला विश्वासास पात्र राहून काम करणार, असे लातूर लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार सुधाकर तुकाराम शृंगारे यांनी विजयानंतर बोलतांना सांगितले.

लातूर जिल्हा परिषद सदस्य यामध्ये माझ्यासाठी फारसे काही नव्हते. परंतु सुरुवात करायची होती म्हणून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. पक्षाशी तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांशी मी एकरुप झालो. लातूर लोकसभा मतदारसंघात मी खासदार होऊ शकतो हा मला आत्मविश्वास होता. हा आत्मविश्वास पूर्ण करण्यासाठी पक्षाने मला संधी दिली व मतदारसंघातील मतदारांनी विश्वास दर्शवून प्रचंड बहुमताने विजयी केले. हा विजय माझा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावामुळे त्यांनी केलेल्या कामामुळे त्याचप्रमाणे लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे हा विजय झालेला आहे, असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या