स्पेशल रेसिपी :- चिकन चॉप

साहित्य

चिकन ३०० ग्रॅम, एक वाटी कांद्याची पेस्ट, दोन चमचे दही, दोन चमचे आलं-लसूण पेस्ट, एक वाटी काजूची पेस्ट, एक चमचा धणेपूड, शाही गरम मसाला, चिमूटभर केसर, फोडणीसाठी तूप किंवा तेल, साखर चवीनुसार, लाल तिखट, हळद, मीठ आवश्यकतेनुसार

कृती

सर्वप्रथम आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, दही, मीठ लावून चिकन मॅरीनेट करून घ्या. त्यानंतर कढईत तूप किंवा तेल गरम करा. त्यात कांद्याची पेस्ट गुलाबी होईपर्यंत परतवा.

त्यानंतर आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, धणेपूड, शाही गरम मसाला, काजूची पेस्ट, मॅरीनेट केलेले चिकन, चवीनुसार मीठ, साखर घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. त्यात केसर टाकून चिकन व्यवस्थित शिजवून घ्या. चटपटीत चिकन चॉप तयार.