मुंबई,पुण्यात ‘त्यांचं’ अस्तित्व जाणवलं-डॉ.मेहरा श्रीखंडे

कविता लाखे, मुंबई

जन्म, मृत्यू आणि आत्मा. ऐकायला, वाचायला जड वाटणाऱ्या अशा या तीन गोष्टी. यातल्या जन्माचं व त्यानंतर येणाऱ्या मृत्यूचं अस्तित्व मानायला आपण तयार असतो. पण मृत्यूनंतर सुप्त रुपात वावरणाऱ्या आत्माचे अस्तित्व मात्र आम्हाला मान्य नाही. कारण तो डोळ्यांना दिसत नाही, त्याच्या असण्याचे ठोस पुरावे आतापर्यंत कोणीही देवू शकलेलं नाही. आत्मा त्याबद्दलचे समज-गैरसमज वाढवण्याचं काम हे चित्रपटांद्वारे झालं, खासकरून हॉलीवूडपटांमध्ये ते जरा जास्तच झालं. पॅरानॉर्मल अॅक्टीव्हिटी म्हणजेच अशा भयावह विचित्र घटना ज्या का घडतात याचं उत्तर अनेकांना सापडलेलं नाहीये. विदेशामध्ये या विषयावर अभ्यास करणाऱ्यांची संख्या पुष्कळ आहे. मात्र हिंदुस्थानात अशा व्यक्तींची संख्या फार कमी आहे. नेत्रशल्यविशारद मेहरा श्रीखंडे यांनी याच विषयावर अभ्यास करायला सुरूवात केली. ज्याप्रमाणे पृथ्वीवर दैवी शक्ती आहे तशीच वाईट शक्तीही आहे. यामुळे आपण कितीही नाकारलं तरी आत्म्यांचं अस्तित्व आज ना उद्या सगळ्यांनाच कबूल करावे लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. डॉ.मेहरा श्रीखंडेना त्यांच्या संशोधनात काय आढळलं हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांची मुलाखत घेण्याचं ठरवलं.

पॅरानॉर्मल अॅक्टीव्हीटी हा विषय असा आहे की जो उच्चारला की अनेकांना ती भ्रामक कल्पना वाटते, काहींना अंधश्रद्धा वाटते तर काहींना त्याची इतकी भीती वाटते की ते या विषयावर बोलणं टाळतात. असा विषय तोही एका नेत्रशल्यविशारद व्यक्तीने घेऊन संशोधन करणं हे थोडंसं आश्चर्यचकीत करणारं होतं. त्यामुळे आम्ही त्यांना पहिला प्रश्न विचारला तो हाच होता की डॉक्टर असूनही पॅरानॉर्मल विषयाकडे कशा वळलात ?

उत्तर देताना त्या म्हणाल्या की लहान वयापासूनच भयकथा ऐकायला आवडायच्या. शरीर आणि आत्मा यांचा थेट संबंध असल्याचे मी लहानपणापासून ऐकत होते. पण मोडिकलचा अभ्यास करताना फक्त मानवी शरीराचाच अभ्यास शिकवला जात होता. त्यात असलेल्या आत्माच साधा उल्लेखही कधी कोणी करत नसे. यामुळे आत्मा काय असतो याचा शोध घेण्यासाठी या विषयाकडे वळले. हॉस्पिटलमध्ये बऱ्याचवेळा ऑपरेशन झालेले रूग्ण शस्त्रक्रियेआधी अॅनेस्थेशिया म्हणजेच भूल दिल्यानंतर आलेले अनुभव सांगायचे.

soul-leaving-body

कोणी सांगायचे शुध्द हरपल्यानंतर मी एकदम वेगळ्या जगात गेलो. तिथून मी स्वत:चे ऑपरेशन बघितले. तर काही जणांनी असेही सांगितले की झोपल्यानंतर दुसऱ्या जगात गेलो. तिथे वेगवेगळे लोक दिसले. पण मी त्यांना बघू शकत होतो. पण त्यांना मी मात्र दिसत नव्हतो. अशा अनेक गोष्टी रुग्ण माझ्याशी शेअर करत. यातूनच मग मी ध्यानधारणेकडे वळले. कारण ध्यान लावणे ही एक अशी अवस्था आहे ज्यात मन एकाग्र करता येते आणि त्याच अवस्थेत आत्मा शरीर सोडून बाहेर जाऊ शकतो. योगी ऋषी महर्षी देखील मेडिटेशन करायचे आणि करतात. यामुळेच त्यांना आजूबाजूच्या नकारात्मक उर्जा जाणवतात.

आत्म्याचे अस्तित्व तुम्हाला कधी जाणवलंय का ?
हो बरेचदा..आत्म्याच्या शोधात मी अनेक वेळा भूत उतरवतात त्या मंदिरांमध्ये गेले. पण तिथे गेल्यानंतर मला त्याचा खूप शारीरिक त्रास झाला. एखाद्या व्यक्तीला आत्म्याचे अस्तित्व जाणवत असेल तर त्याचा त्रास होतो. माझ्याकडे अनेक जण येत body-healingअसतात ज्यांना कोणीतरी सतत त्यांच्या सोबत असल्याचा भास होते. तर काही जण मला भेटले जे अचानक विचित्र वागू लागले, वेगळी भाषा बोलू लागले.मी त्यांना हिलींग एनर्जी, बॉडी क्लिनिंग करुन त्यांच्यातील नकारात्मक उर्जा दूर करण्याचा अधिकाधिक प्रयत्न केला. पण या सगळ्या गोष्टींचा मला खूप त्रासही होतो. मी वरचेवर आजारी पडू लागले त्यामुळे कालांतराने या गोष्टी कमी केल्या आणि माझ्याकडे येणाऱ्या लोकांना मी आता या विषयात पारंगत असलेल्यांकडे पाठवते. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये अशा अनेक रिकाम्या, ओसाड, पडक्या जागा आहेत जिथे मी गेली आहे आणि मला तिथे या गोष्टींचं अस्तित्व जाणवलं आहे.

या व्यवसायाचा डॉक्टरी पेशावर काही परिणाम होतो का ?
हो नक्कीच. सायन्स ‘आत्मा’ या संकल्पनेला मानत नाही. त्यामुळे माझे सहकारी मित्र माझ्यावर नाराज होतात. हा अंधविश्वास असल्याच मला सांगतात. माझ्याशी अनेकांनी मैत्रीही तोडली.पण मी लोकांना मदत करत असते, कारण जोपर्यत तुम्हांला आत्म्याचा अनुभव येत नाही तोपर्यत तुमच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही.म्हणून मी माझे काम करत असते. काही वेळा मानसोपचारतज्ज्ञ असलेले माझे मित्रही त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांच्या मदतीसाठी माझी मदत घेतात. सुशिक्षित लोक माझ्याकडे येतात कारण ते भगत किंवा मांत्रिकाकडे जायला घाबरत असतात. आपल्या देशात आजही या गोष्टी भाकडकथा असल्याचं मानून अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. पण काही देशांनी मात्र यातील गांभीर्य ओळखले असून लोकांच्या मदतीसाठी अनेक ठिकाणी पॅरानॉर्मल क्लिनिक्स सुरू केली आहेत.

ghost-and-soulया जगात आत्मा भूत,पिशाच्चं जर असतील तर मग ते दिसत का नाहीत ?
तुम्ही तुमच्यातला सेव्हन्थ सेन्स जागृत केला तरच तुम्हाला आत्म्याचं अस्तित्व जाणवू शकतं. अनेकदा लहान मुलं घाबरतात,त्याचं कारण ते सांगू शकत नाहीत अशा वेळी कोणती तरी वाईट शक्ती,नकारात्मक उर्जा त्यांच्या आजूबाजूला असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पालकांनी घरातल्या मोठ्या व्यक्तींनी याकडे दुर्लक्ष करू नये.

तुम्ही या विषयावरील अभ्यासाला केव्हापासून सुरूवात केली?
मी ८०च्या दशकापासून अभ्यास करतेय. पण त्यावेळी या विषयाबाबत एवढी उत्सुकता नव्हती. बाहेरील देशात पॅरानॉर्मल अॅक्टिव्हीटीवर संशोधन मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र आपल्या देशात यावर म्हणावं तसं संशोधन झालेलं नाहीये. आपल्याकडे आत्मा, भूत-खेतं हा विषय निघाला की त्याला अंधश्रद्धा म्हटलं जातं. अनेक भोंदू बाबा, बुवा लोकांची फसवणूक करतात, त्यामुळे लोक सहजासहजी या गोष्टींवर विश्वास ठेवायला तयार होत नाही

या अगम्य गोष्टींचं अस्तित्व मान्य तरी कसं करणार ?
ही गोष्ट अशी आहे जी शास्त्रासारखी एखाद्या प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही.  मात्र हल्ली किरलीयन कॅमेरा किंवा इन्फ्रारेड कॅमेऱ्यांच्या मदतीने आत्मा नाही मात्र  त्यांची आकृती टीपता येऊ शकते.

आत्मा आणि भूतांप्रमाणे तुम्ही परग्रहवीसांबाबतही अभ्यास केला आहेत ?
planets-imaginationहो मी त्याबाबतही अभ्यास केला आहे. आपली आकाशगंगा खूप मोठी आहे. त्या विशाल आकाशगंगेमधला आपला ग्रह पृथ्वी हा खूप छोटा ग्रह आहे. या ग्रहावर वैविध्यपूर्ण सौंदर्य असल्यानं परग्रहवासी इथे येत असतात. आणि हे आजच नाही तर मानवाच्या उत्क्रांतीपासून ते इथे येत आहेत. माकडापासून मनुष्यापर्यंतच्या उत्क्रांतीमध्ये देखील परग्रहवासीयांचा हात असावा कारण माकड हा मानवात रूपांतरीत होणं हे बऱ्याच गोष्टींमध्ये अशक्य आहे. प्रगत देशांनाही थक्क करणाऱ्या गोष्टी मानवाने फार पूर्वी उभारून दाखवल्या आहेत. तंत्र आणि शास्त्र याची कल्पना नसतानाही ही गोष्टी उभ्या कशा राहील्या, त्यासाठी त्यांना परग्रहवासीयांना मदत केली का ? यावर सध्या बरंच संशोधन सुरू आहे. ज्यातून हे शक्य होऊ शकतं असं सांगण्यात येत आहे.

[email protected]