स्पेशल पार्टीचा स्पेशल लूक!

पार्टी टाईम कधीचाच सुरू झालाय. उद्या 31st ने त्यावर चार चांद लागणार आहेत. या स्पेशल पार्टीत स्पेशल दिसण्यासाठी…

मेकअपची सुरुवात

 • चेहरा फेस वॉशने स्वच्छ धुऊन नंतर चेहऱ्यावर पाच ते दहा मिनिटे बर्फ फिरवा.
 • मेकअप करण्यापूर्वी लोशन किंवा मॉईश्चरायझरचा वापर करा. चेहऱ्यावर तेलकटपणा राहत नाही.
 • त्वचेच्या रंगानुसार फाऊंडेशनची निवड करा.
 • चेहऱ्यावर ब्रशच्या सहाय्याने शिमर पावडरचा वापर करा. त्याने मेकअप बराच वेळ टिकण्यास मदत होते.
 • गालांवर ब्लशरचा वापर करायचा. त्याने आणखी चेहरा आकर्षक वाटतो.

डोळ्यांसाठी मेकअप

 • पार्टी ही साधारण रात्रीची असते अशा वेळी डोळ्यांना डार्क मेकअप उठून दिसतो. डोळ्यांना आय शॅडो लावा.
 • डोळ्यांना आय लायनर लावावे.
 • पापण्यांना मस्काराचे दोन कोट लावावेत.
 • भुवया उठावदार दिसण्यासाठी आयब्रो पेन्सिल फिरवा.

पोशाख
पार्टीमध्ये काळा रंग हा सगळ्यांचाच ऑलटाईम फेव्हरेट रंग आहे.या रंगाचे कपडे परिधान करू शकतात. सध्या मॅक्सी गाऊन, शॉर्ट वन पीस, स्कर्ट, क्रॉप टॉप अशाप्रकारचे कपडे घालू शकता. त्यामुळे थोडा पार्टी लूक येतो. शिवाय अलीकडे सोनेरी, चंदेरी रंगही पार्टीचा लूक वाढवत आहेत. ड्रेससोबत सफेत स्नीकर्स घालू शकता.

ओठांसाठी मेकअप

 • पार्टीचा मेकअप थोडा डार्क असलेलाच चांगला वाटतो, पण जो रंग ओठांवर शोभून दिसेल तोच लावा.
 • आता लिप्सच्या आऊटलाइनवर डार्क रेड किंवा ब्राऊन कलर केल्यानंतर ब्रशच्या मदतीने त्यावर लिप कलर फिल करा, ज्याने फिनिशिंग येईल.
 • आता लावलेली लिपस्टिक टिश्यू पेपरचा दाब द्या आणि पुन्हा लिपस्टिक लावा.
 • नंतर त्यावर ग्लॉसही अप्लाय करू शकता. त्यामुळे ओठांवर लिपस्टिक बराच वेळ राहते. हे लक्षात ठेवा.
 • पार्टी मेकअप हा नेहमीच्या मेकअपपेक्षा वेगळा आणि डार्क असावा. त्याने पेहराव उठावदार वाटतो.
 • मेकअप प्रॉडक्ट, ऍक्सेसरीज, कपडे यांचे एक दिवस आधीच नियोजन करायला हवे.
 • पार्टीला जाताना आंघोळ करून गेलात तर चेहऱयावर वेगळी चमक दिसते आणि स्वच्छ वाटते.
 • मेकअपबरोबरच हेअरस्टाईलही तितकीच महत्त्वाची असते.आपल्या पेहरावाला शोभेल अशी हेअरस्टाईल करायला हवी.
 • नेहमी केस मोकळे सोडत असाल तर डिझायनर वेणी बनवा.