लातूर लोकसभा मतदारसंघात 6 दिव्यांग विशेष व सखी मतदान केंद्र


सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रशासनाच्या वतीने ६ ठिकाणी दिव्यांग मतदान केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे तर एक मतदान केंद्र धाराशिव लोकसभा मतदारसंघात आहे. त्याचप्रमाणे यावेळी प्रथमच लातूर लोकसभा मतदारसंघात ६ ठिकाणी सखी मतदान केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. तर एक केंद्र धाराशिव लोकसभा मतदार केंद्रात स्थापन करण्यात आलेले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व सहाय्यक निडणूक निर्णय अधिकारी दिपाली मोतीयेळे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात केवळ लातूर जिल्ह्यातच हा उपक्रम जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आलेला आहे. त्यामध्ये लातूर लोकसभा मतदारसंघात सहा ठिकाणी तर धाराशिव लोकसभा मतदारसंघात एका ठिकाणी दिव्यांग विशेष मतदान केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. लातूर ग्रामीण विधासभा मतदारसंघातील २४० जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखरा, लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील १६४ सुशिलादेवी देशमुख निवासी मुलींचे विद्यालय लातूर, अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील ११२, विमलबाई देशमुख कन्या शाळा अहमदपूर, उदगीर विधानसभा मतदारसंघातील २७०, लाल बहादूर शास्त्री विद्यालय पश्चिम बाजू, निलंगा विधानसभा मतदारसंघातील २९० जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा  मुलींची उत्तर बाजू तर लोहा  वधानसभा मतदारसंघातील ८६, पारडी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा डावी बाजू तर धाराशिव लोकसभा मतदारसंघातील औसा विधानसभा मतदारसंघातील ६१, पंचायत समिती कार्यालय पुर्व बाजू औसा या ठिकाणी दिव्यांग विशेष मतदान केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे.

यावेळी सहा ठिकाणी सखी मतदान केंद्राची स्थापनाही करण्यात आलेली आहे. या मतदान  केंद्रावर नियुक्त सर्व कर्मचारी महिलाच असणार आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघातील लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील २८२, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भातखेडा. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील ५८, गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय नवीन इमारत. अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील ११४, विमलाबाई देशमुख कन्या शाळा अहमदपूर दक्षिण बाजू. उदगीर विधानसभा मतदारसंघातील २६९ लाल बहादूर शास्त्री विद्यालय पुर्व बाजू उदगीर.  निलंगा विधानसभा मतदारसंघातील २७७ पंचायत समिती सभागृह निलंगा. लोहा विधानसभा मतदारसंघातील २०४, श्री शिवाजी माध्यामिक उच्च माध्यमिक विद्यालय पानभोसी रोड पुर्व बाजू वंâधार तर धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये औसा विधानसभा मतदारसंघातील ६०, पंचायत समिती कार्यालय पश्चिम बाजू या केंद्रावर सर्व महिला कर्मचारी असणार आहेत.