Video दुबईला जाणाऱ्या विमानाचे टायर फुटले, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

58
spice-jet

सामना ऑनलाईन । जयपूर

जयपूर येथून दुबईला निघालेल्या स्पाईस जेटच्या जयपूर-दुबई विमानाचे उड्डाणानंतर काही मिनिटातच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. उड्डाणावेळी विमानाचे एक टायर फुटल्याने हा निर्णय घेण्यात आला. या विमानातील 189 प्रवाशांना जयपूर विमानतळावर सुखरुप उतरवण्यात आले आहे.

स्पाईस जेटच्या एसजी 58 जयपूर – दुबई या विमाने जयपूर विमानतळावरून सकाळी 9:30 मिनिटांनी उड्डाण केले. मात्र त्याच वेळी एक टायर फुटल्याचे पायलटच्या लक्षात आले. अखेर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आणि सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या